SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीच्या बाल्कनीचा गिलावा पडला ; सुरक्षिततेसाठी सेफ्टीनेट लावणार

schedule27 Aug 26 person by visibility 307 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी मार्केट येथील इमारतीच्या बाल्कनीचा गिलाव्याचा अंशतः भाग आज (दि. 27) दुपारी 12 वाजता चप्पल लाईन दुकानासमोरील बाजूस पडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीचे बांधकाम सन 1989 मध्ये पूर्ण झाले असून इमारतीस 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. इमारतीच्या काही भागाचे यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत महापालिका पॅनेलवरील स्ट्रक्चरल इंजिनिअर यांना यापूर्वीच कळविण्यात आले असून, त्यानुषंगाने स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सध्या सुरू आहे

दरम्यान, आज बाल्कनीचा गिलावा पडल्याची घटना घडल्यानंतर संबंधित इमारतीची पाहणी करण्यात आली. इमारतीच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरती उपाययोजना म्हणून रस्त्याकडील बाजूस सेफ्टीनेट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्यानंतर स्ट्रक्चरल अभियंत्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांनुसार इमारतीच्या दुरुस्तीबाबत आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes