+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustनव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे १४ संशोधक adjustशिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील बंडू कोळी यांचे यश adjust कोल्हापूर शहरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान स्वच्छता पंधरवडा मोहिम adjustकोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल adjustआमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट adjustडीकेटीई म्हणजे उज्वल करिअर : डॉ सपना आवाडे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना स्वागत समारंभात दिला कानमंत्र adjustइंजिनिअरिंग अभ्यास करताना 'नव संकल्पनाचा ध्यास' घ्या : विनायक भोसले adjust'गुलाबी' उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग; २२ नोव्हेंबरला येणार भेटीला adjustअज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule18 Sep 24 person by visibility 144 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या बी. ए. फिल्म मेकिंग तसेच पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या शॉर्ट फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी येथील कोल्हापूर चित्रनगरीला भेट देऊन मालिका व चित्रपट निर्मितीची माहिती जाणून घेतली.

चित्रनगरीमध्ये सुरु असणाऱ्या विविध टिव्ही मालिकांच्या शूटिंग सेटला विद्यार्थ्यांनी भेट देऊन मालिकेची निर्मिती प्रक्रिया जाणून घेतली. तसेच नव्याने उभारण्यात येत असलेल्या रेल्वे स्टेशन सेट व इतर फ्लोअर व अन्य सोयींबाबत सचिन कुडची यांनी माहिती दिली.

 चित्रपट, लघुपट व मालिकांची निर्मिती आणि प्रोडक्शन, दिग्दर्शकाची भूमिका, कथा, संवाद, लोकेशन्सची निवड, सीन, कॅमेरा अँगल आणि हालचाल, व्हिज्युअल कंपोझिशन, सिनेमॅटोग्राफरची भूमिका, मालिकेची स्क्रिप्ट, कलाकारांचे संवाद, व्हॉईस रेकॉर्डिंग, एडिटिंग आदी विषयी विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. ज्येष्ठ गॉफरमन सुरेश लाड यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या लाईट, फिल्टर्स, कटर्स, स्टॅन्ड यांची माहिती दिली. येथे उभारण्यात आलेले मंदिर, वाडा, चाळ, पौराणिक काळातील गाव आदीचे सेट डिझाईन विद्यार्थ्यांनी अनुभवले. 

निर्मिती व्यवस्थापक मिलिंद अष्टेकर, निर्माता शंतनु गंगणे, अभिनेते शशांक शेंडे, तेजा नेसवणकर तसेच दिग्दर्शक निशांत सुर्वे व मकरंद माने यांनी विद्यार्थ्यांना चित्रपट, लघुपट व मालिकांची निर्मिती प्रक्रिया आणि प्रोडक्शन बाबत माहिती दिली. कॅमेरामागे काम करणाऱ्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार करावे, असा सल्ला अष्टेकर यांनी दिला.

ही भेट यशस्वी होण्यासाठी चित्रनगरीचे व्यवस्थापक दिलीप भांदीगरे, डॉ. कविता गगराणी यांनी प्रयत्न केले. विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव व प्रसिद्ध अभिनेते आनंद काळे यांनी अभ्यास भेटीसाठी प्रोत्साहन दिले. लेखक- दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी भेटीचे संयोजन केले. डॉ. सुमेधा साळुंखे व जयप्रकाश पाटील यांनी सहाय्य केले.