कोल्हापूर : स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि.15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8.15 वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. यानंतर माझी वसुंधरा कार्यक्रमाअंतर्गत शपथ घेण्यात आली.
यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त साधना पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता सतीश फप्पे, रमेश कांबळे, महादेव फुलारी, आर के पाटील, नगरसचिव सुनिल बिद्रे,
इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, परवाना अधिक्षक राम काटकर, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, पर्यावरण अभियंता अवधूत नेर्लेकर, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग राजपूत, विजय वणकुद्रे, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थींनी, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.