SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीईचे प्रा. व्ही.बी. सुतार यांना पी.एच.डी. प्रदानधनंजय महाडीक युवा शक्ती व भागीरथी महिला संस्थेकडून 200 क्षयरुग्ण दत्तकचित्रनगरीच्या विकासासाठी अधिक निधी देणार : सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारकोल्हापुरात भाजपच्यावतीने आरोग्य शिबीर उत्साहातगडमुडशिंगीमध्ये ७५ वडांच्या झाडांंचे नमो पार्क महाराष्ट्रातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम : सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार शिक्षक टीईटी प्रश्नी मुख्यमंत्र्यांशी बोलणार : खा. शरद पवारनव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…; चित्र प्रदर्शनाचे उद्घाटनजिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन गणपतीसाठी तब्बल ६ लाख कोकणवासियांनी एसटीने केला सुखरुप प्रवास : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्नके.एम.टी.ची 'श्री दुर्गादर्शन' विशेष बस सेवा दि.22 सप्टेंबरपासून सुरु

जाहिरात

 

कोल्हापुरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे ६०० विद्यार्थिनींना मोफत एचपीव्ही लसीकरण

schedule31 Jul 25 person by visibility 1449 categoryआरोग्य

कोल्हापूर : “खुद से जीत” या प्रेरणादायी संकल्पनेला साकारत हसन मुश्रीफ फाऊंडेशन आणि इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ संचलित इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३१ जुलै रोजी २५० मुलींना लस देण्यात आली व १ ऑगस्ट पा ३५० मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. अशी दोन दिवसात तब्बल ६०० विद्यार्थिनींना लस देण्यात येणार आहे. प्रथम विद्यार्थिनींनी पालकांचे संमती पत्र भरून दिले. लस टोचणे अगोदर नाश्ता देवून अर्ध्या तासानंतर लस टोचून वर्गात बसविण्यात आले.

 कोल्हापूर शहरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल ही एचपीव्ही लस मुलींना देणारी पहिली शाळा ठरली आहे व  इंनेरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ ही हसन मुश्रीफ फाऊंडेशन च्या सहकार्याने लस मोफत पुरवणारी पहिली NGO    ठरली आहे.

या उपक्रमात इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७च्या चेअरमन उत्कर्षा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका  एस.आर. पाटील, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षा रुक्मिणी हेगिष्टे, सचिव स्मिता घोसाळकर, खजिनदार सोनाली चौधरी, आयएसओ ज्योती रेड्डी, आयपीपी डॉ. मनीषा चव्हाण, तसेच माजी अध्यक्ष हेमा भोसले, बीना मोहिते, स्वाती गुने, शर्मिष्ठा चौगुले, मनीषा संकपाळ, आणि क्लबच्या सदस्यांमध्ये प्राची चव्हाण, उषा पाटणकर, शीतल नर्सिंघाणी, पूनम नर्सिंघाणी शाळेचे पर्यवेक्षक ए डी भोई,एस एस इनामदार यु आर भेंडेगिरी , वैजयंती पाटील यांची उपस्थिती होती.

तसेच छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, सर्व डॉक्टर व त्यांच्या टीमने महत्त्वपूर्ण सहकार्य केले.  

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधी लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, ९ ते १४ वयोगटातील मुलींना ही लस अत्यंत प्रभावी ठरते आणि भविष्यातील आरोग्यधोके कमी होतात.

हसन मुश्रीफ फाऊंडेशन आणि इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ संचलित इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळेने केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes