पिरामल स्वास्थ्य, सनोफी यांच्यातर्फे कळंबा येथे मोफत आरोग्य शिबिर
schedule12 Jul 25 person by visibility 245 categoryआरोग्य

कोल्हापूर : पिरमल स्वास्थ्य व सनोफी यांच्या मार्फत कळंबा ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने कळंबा प्राथमिक आरोग्य केंद्र (माळवाडी) येथे आज शनिवारी 12 जुलै रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरामध्ये 30 वर्षांवरील सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. या मध्ये मुख्यतः उच्च रक्तदाब व मदुमेह यांची मोफत तपासणी करण्यात आली या मध्ये ६० पेक्ष्या जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला.
संस्थेचा मुख्य उद्देश हा जास्तीत जास्त नवीन नागरिकांचे स्क्रीनिंग करून त्यांना लवकरात लवकर उच्च रक्तदाब व मधुमेह याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे व त्यांना आरोग्य सेवे पर्यंत पोहोचवणे आहे. त्याचबरोबर समाजामध्ये उच्च रक्तदाब व मधुमेह या आजाराची जनजागृती करणे. या पुढील 6 महिने ही सेवा महिन्यातून 1 वेळा गावात येऊन नागरिकांचे आरोग्य तपासणी करणार आहे. तसेच या शिबिरामध्ये कोल्हापूर आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले.
यावेळी सरपंच सुमन गुरव, उपसरपंच पूनम जाधव, सदस्य उदय जाधव, विकास पोवार, संदिप पाटील, रोहित मिरजे, रोहित जगताप, इतर सदस्य व माजी सरपंच विश्वास गुरव, उत्तम जाधव, आदी उपस्थित होते. याचबरोबर पिरामल स्वास्थ सनोफी या संस्थेचे कोऑर्डिनेटर मयूर कुकडे यांच्या मार्गदर्शनानुसार कम्युनिटी मोबिलायझर संदीप खोत तसेच नर्सिंग स्टाफ जाग्रुती कदम कादंबरी कवठणकर गाडी पायलट अक्षय तोरस्कर तसेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आशा वर्कर यांचे सहकार्य लाभले.