कोल्हापूर जिल्हा वाहतुक सल्लागार समितीची बैठक : वाहतूक समस्या, उपाययोजना बाबत सकारात्मक चर्चा
schedule12 Jul 25 person by visibility 154 categoryसामाजिक

कोल्हापूर : पोलीस अधीक्षक कायार्यालय कोल्हापूर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये दिनांक १२ रोजी सकाळी ११.०० वा. कोल्हापूर जिल्हा वाहतूक सल्लागार समितीची बैठक पार पडली ही बैठक पोलीस अधीक्षक योगेशा कुमार यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. बैठकी मध्ये उपस्थित अनेक मान्यवरांनी कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्या मांडल्या व त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याचाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
त्यामध्ये शहराची सध्याची लोकसंख्या व वाहनांची संख्या, शहरातील अरुंद रस्ते त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, अनेक ठिकाणी वाहनांच्या यु टर्न मुळे होणारी वाहतूक कोंडी, सिग्नल चौकातील अतिक्रमण व त्यावरील उपाय योजना, शाळा भरणेच्या व सुटण्याचे वेळी होणारी वाहतूक कोडी व त्यावरील उपाययोजना, विदयार्थी वाहतूक सुरक्षित होषणे बाबत सुचना, वाहनांचे, खाजगी ट्रॅव्हल्स बसेस पार्कींग करीता सुविधा निर्माण करणे, नो हॉकर्स व हॉकर्स झोन करणे, चुकाना समोर लावणेत येणारे बोर्ड, लोखंडी पायाड बामुळे वाहनांना पाकींग करीता अडथळा होणे, टुक टर्मीनस सुविधा, शटल सींस सुरु करणे, वापरात नसलेले बस स्टॉपचे केबिन चा अडथळा, स्कुल बस, विदयार्थी वाहतूक रिक्षा, व्हॅन ही वाहने रस्त्यावर उभ्या केल्या जातात त्यांना शाळेच्या आवारात प्रवेश देणे, दुकानाचाहेर रस्त्याचे दिशेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणणे, सिग्नल चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करणे विविध वाहतूकीच्या समस्या व त्या वर करावयाच्या उपायोजना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.
या बैठकीस पोलीस अधीक्षक योगेश कुमार तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग अजित टिके तसेच शाहुपूरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, जुना राजवाडा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रभारी रविंद्र कळमकर, कोल्हापूर महागरपालिका कडील मा. अति. आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता रमेश मस्कर, सहा. अभियंता ट्रॅफिक विभाग सुरेश पाटील, जल अभियंता विभाग श्रीमती मयुरी पटवेगार, केएमटीचे नितीन पोवार, राज्य परीवहन एस.टी विभागाचे संतोष बोगरे, बीएसएनएल चे उपविभागीय अधिकारी सचिन धनवडे, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष आनंद माने, लॉरी असो. अध्यक्ष सुभाष जाधव, विदयार्थी वाहतूक संघटना अध्यक्ष शिवाजी पाटील, करवीर ऑटो युनियनचे अध्यक्ष सुभाष शेटे, विमलेश्वर फेडरेशनचे विनायक रेवणकर, ग्रेन मर्चेंटस चे श्री. वैभव सावर्डेकर, आरएसपी चे सचिव श्रीकांत मोरे, प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे राजारामपुरी व्यापारी असो.चे प्रशांत पोकळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासो पाटील, जयेश ओसवाल, रियाज नदाफ, कोल्हापूर फर्स्ट चे कौशल सामाणी, जिल्हा ग्राहक संरक्षण सदस्य अनिल जाधव तसेच शशीकांत ढवण वगैरे निमंत्रीत व सल्लागार समिती सदस्य यांचे उपस्थितीत बैठक पार पडली.