पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
schedule23 Oct 26 person by visibility 128 categoryराजकीय
कोल्हापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रांवर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. जिल्ह्यात शांततेत पार पडलेल्या या प्रक्रियेत शिक्षक मतदारसंघासाठी तब्बल ८८.६२% तर पदवीधर मतदारसंघासाठी ६३.८३% मतदान नोंदवले गेले.
सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतदानानंतर दुपारच्या सत्रात केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसून आल्या. दरम्यान, एका केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
जिल्ह्यातील विविध केंद्रांवर अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतपेट्या पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात रवाना होणार असून, मतदानाचा हा वाढलेला टक्का कोणाला विजयाचा गुलाल लावणार, याचा फैसला २७ ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.