51,840/-रु किंमतीची गोवा बनावट दारु, रेनॉल्ट डस्टर, इतर साहित्य असा एकूण 7,51,840/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त
schedule06 Oct 25 person by visibility 198 categoryगुन्हे

कोल्हापूर : 51,840/-रु किंमतीची गोवा बनावट दारु, रेनॉल्ट डस्टर व इतर साहित्य असा एकूण 7,51,840/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.
तपास पथकाने राधानगरी रोडवर नवीन वाशीनाक्याजवळी द स्पाइस हॉटेल समोर सापला लावून रेनॉल्ट डस्टर गाडी थांबवून बाजुला घेतली व त्या गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये मॅगडॉल्स नंबर 1 व रॉयल स्टॅग व्हिस्की कंपनीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारुचे बॉक्स मिळुन आले. सदर गाडीतील 01) शुभम शिवकुमार साळुंखे, वय 28 व 02) आशितोष हिंदुराव साळुंखे, वय27, दोघे रा. वॉर्ड नं. 1 जाधवनगर आंधळी पलूस, ता. पलूस, जि. सांगली यांचेसह गाडी ताब्यात घेतली.
सदर रेनॉल्ट डस्टर गाडी क्रमांक एम. एच. 10-सी.ए.8211 या गाडीमध्ये मॅगडॉल्स नं. 1 कंपनीची 180 मिलीचे गोवा बनावटीचे विदेशी दारुचे 06 बॉक्स व रॉयल स्टॅग व्हिस्की कंपनीची 180 मिलीचे गोवा बनावटीचे विदेशी दारुचे 06 बॉक्स असा एकूण 51,840/- रु किंमतीची गोवा बनावटीची दारु व रेनॉल्ट डस्टर गाडी असा एकूण 7,51,840/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला तो कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला. दोन्ही आरोपींना त्यांचे कब्जात मिळालेले मुद्देमालासह करवीर पोलीस ठाणे येथे हजर केले असून त्यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास करवीर पोलीस ठाणे यांचे करवी सुरु आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक बी. धिरजकुमार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अमंलदार योगेश गोसावी, प्रदीप पाटील, गजानन गुरव, वैभव पाटील, विजय इंगळे, शिवानंद स्वामी, संजय पडवळ यानी केलेली आहे.