कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, हातकणंगलेत परिसरात जोरदार पाऊस
schedule17 Apr 24 person by visibility 1003 categoryसामाजिक
जयसिंगपूर : हातकणंगले, जयसिंगपूर शिरोळ, कुरुंदवाड घोसरवाड, दत्तवाड आदी परिसरामध्ये आज बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार झोडपले. काही परिसरामध्ये गारांचा पाऊस झाला
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याचा पारा 39 अंशांवर पोचला आहे. तसेच गेल्या महिन्याभरामध्ये उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आज बुधवारी दुपारी पावसाने दमदार हजेरी लावत परिसरात गारवा निर्माण केला. यामुळे उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.
आज अचानक पाऊस झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून बच्चे कंपनी पावसामध्ये भिजत गारा वेचून त्याचा आस्वाद घेतला.

