कोल्हापूरः शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनानिमित्त विद्यापीठ अधिविभाग व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी दि. 23 सप्टेंबर रोजी स्वलिखित कविता वाचन व दि. 25 सप्टेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोन्ही स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे रु. 1501, 1001 व 701 रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धा हिंदी विभागात सकाळी 11 वाजता सुरू होतील. स्पर्धेचे माध्यम हिंदी असणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी हिंदी भारत की सांस्कृतिक धरोहर, हिंदी भाषा और युवाओं का भविष्य, हिंदी फिल्मों का समाज पर प्रभाव, रिल्स का युवाओं पर प्रभाव, वैश्विक स्तर पर हिंदी, सिनेमा और मीडिया में हिदी भाषा का प्रभाव इ. विषय निश्चित करण्यात आले आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन हिंदी विभागप्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी केले आहे.