+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustनव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे १४ संशोधक adjustशिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील बंडू कोळी यांचे यश adjust कोल्हापूर शहरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान स्वच्छता पंधरवडा मोहिम adjustकोल्हापूरकरांचा पर्यावरणपूरक विसर्जनाकडेच कल adjustआमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 72 क्षयरुग्णाना पोषण आहार किट adjustडीकेटीई म्हणजे उज्वल करिअर : डॉ सपना आवाडे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना स्वागत समारंभात दिला कानमंत्र adjustइंजिनिअरिंग अभ्यास करताना 'नव संकल्पनाचा ध्यास' घ्या : विनायक भोसले adjust'गुलाबी' उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग; २२ नोव्हेंबरला येणार भेटीला adjustअज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule18 Sep 24 person by visibility 219 categoryसामाजिक
जयसिंगपूर :श्री. सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात 15 सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेचे संयोजन संस्थेचे मानद सेक्रेटरी किरण कापसे व खजिनदार सूर्यकांत बदामी यांनी केले. 

प्रास्ताविक अध्यक्ष अनिल इनामदार यांनी केले. यावेळी त्यांनी संस्थेचा वार्षिक आढावा सादर केला. तसेच नियोजित संकल्पनांचा आढावा घेतला. त्यामध्ये संस्थेच्या आवारातील वृक्षारोपण, शुद्ध पिण्याचे पाणी, क्रीडांगणाचा विकास, चिल्ड्रन पार्क, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम करणे संदर्भात इच्छा व्यक्त केली.

 यापैकी संस्थेच्या आवारात 160 झाडांचे वृक्षारोपण झाले आहे. त्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटीने ‘५० ट्री गार्ड' दिले आहे. याबद्दल उपस्थित विद्यापीठाचे विश्वस्त व सदस्य विनायक भोसले यांचे आभार मानण्यात आले.

या सभेत नऊ ठराव मांडण्यात आले. जे बहुमताने मंजूर करण्यात आले. सिद्धिविनायक गृहनिर्माण संस्थेकडे उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग सोसायटीच्या हितासाठी व विकासासाठी व्हावा यासाठी भविष्यातील योजनांची आखणी केली जाईल असे सर्वानुमते ठरले.

   यावेळी संस्थापक सदस्य डॉ. श्रीमती पुष्पलता इनामदार उपस्थित होत्या. तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुधीर कुलकर्णी यांनी केले.