डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
schedule27 Oct 25 person by visibility 147 categoryशैक्षणिक
कोल्हापूरः श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने 'इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्लॉकचेन डिस्ट्रीब्यूटेड सिस्टम्स अँड सिक्युरिटी ' या अत्याधुनिक विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक 30, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर दरम्यान केले आहे.
सदर कॉन्फरन्स ३ टप्प्यांमध्ये होणार असून गुरुवार दि. ३० ऑक्टोंबर रोजी डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी कोल्हापूर येथे संपूर्ण दिवस कार्यशाळा, शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी हॉटेल सयाजी कोल्हापूर येथे कॉन्फरन्स चे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन सकाळी ठीक १०.०० वाजता होणार आहे आणि शनिवार दि. ०१ नोव्हेंबर रोजी हॉटेल पॅव्हेलियन कोल्हापूर येथे सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
IEEE मुंबई सेक्शन, पुणे सेक्शन आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही सिग्नेचर परिषद होत आहे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून देश परदेशातील अनेक तज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे संशोधन क्षेत्राला उल्लेखनीय गती मिळेल, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर्स (IEEE) ही जगप्रसिद्ध तांत्रिक व्यावसायिक संस्था आहे. नेटवर्किंग, इंटरनेट, वायफायची जागतिक मानके विकसित करण्यात IEEE चे महत्त्वाचे योगदान आहे. IEEE ची ही दक्षिण महाराष्ट्रातील पहिलीच परिषद असून जपान, अमेरिका, सौदी अरेबिया अशा परदेशातील आणि भारतातील नामांकित विद्यापीठातील, तंत्रज्ञान संस्थांमधील संशोधकांचे एकूण 1079 शोधनिबंध परिषदेस प्राप्त झाले असून निवडक 210 शोधनिबंध सादर व प्रकाशित करण्यात येणार आहेत.
परिषदेमध्ये जपान च्या सुरक्षा मंत्रालयातील उच्च अधिकारी वैभव मेहता यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार असून ऑस्ट्रेलिया येथील करटेन युनिव्हर्सिटी चे शास्त्रज्ञ डॉ. विद्यासागर पोतदार यांचेही व्याख्यान आयोजित केले आहे. या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे चे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठ यांचे कुलगुरू डॉ. राजेश इंगळे यांच्यासह अनेक नामांकित इंजिनिअरिंग महाविद्यालयातील प्राचार्य, संशोधक, प्राध्यापक, उद्योजक, धोरणकर्ते विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या मुख्य विषयाच्या अनुषंगाने पॅनल चर्चा होऊन नवीन संकल्पनांचा उदय होईल, तसेच संशोधन क्षेत्रातील सहयोग
वाढेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला, शिक्षण, संशोधन आणि सामाजिक विकास यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे यांचे आंतरराष्ट्रीय परिषदेला मार्गदर्शन लाभले आहे. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, मुख्य प्रशासकीय अधिकारी अमित आवाड पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होते.