कोल्हापुरातील परीख पुलाचा एकेरी रस्ता वाहतुकीस बंद...
schedule27 Oct 25 person by visibility 79 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.३ राजारामपूरी कार्यक्षेत्रातील परीख पुल परिसरात रस्त्याचे काँक्रीटीकरण व गटर करण्याचे कामामुळे मंगळवार, दि.28 ऑक्टोंबर २०२५ पासून सुरु करण्यात येणार आहे.
त्यासाठी नागरिकांना आर.एल.ज्वेलर्स ते जेम्सस्टोन कडून परिख पुलाकडे येणारी वाहूतक व रेल्वे फाटकाकडून जेम्सस्टोनकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर मध्यवर्ती बस स्थानकाच्या कंपाऊंडला लागून परिख पुलाकडे येणारा जो रस्ता आहे. हा रस्ता एकेरी वाहतूकीस सुरू ठेवण्यात येणार आहे. सदरच्या रस्त्याचे काम पुर्ण झालेनंतर तो रस्ता खुला करुन त्यानंतर दुसऱ्या बाजुचा मध्यवर्ती बस स्थानकालगत असलेला एकेरी वाहतुकीचा रस्ता व टाकाळयाकडे जाणारा रस्ता बंद ठेवून तेथील काम पूर्ण करुन घेण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी सदरचे काम पुर्ण होईपर्यंत पर्यायी रस्ताचा वापर करावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.