SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : प्रारुप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार; महापालिकेत बैठक संपन्न कोल्हापुरातील परीख पुलाचा एकेरी रस्ता वाहतुकीस बंद...पीएम किसान अंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये : पालकमंत्री प्रकाश आबिटकरवैद्यकीय क्षेत्रात कोल्हापूरची एक वेगळी ओळख निर्माण करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफमाथेरान येथे ई रिक्षा सुरु करण्याची कार्यवाही गतीने करा : पर्यटनमंत्री शंभूराज देसाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजनलघु उद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 30 नोव्हेंबर पूर्वी अर्ज करावेतलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृती मोहीम सुरु; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपास्थितीत घेतली शपथमहाराष्ट्र गौरव पुरस्कार व सुवर्ण महोत्सवी अनुदान घेणाऱ्यांनी हयात दाखला जमा करावादुसरे महायुध्द - अनुदान लाभार्थ्यांनी हयात दाखला जमा करावा

जाहिरात

 

कोल्हापूर : प्रारुप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार; महापालिकेत बैठक संपन्न

schedule27 Oct 25 person by visibility 86 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही यादी दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

महानगरपालिकेकडून या कामासाठी सर्व सहा. आयुक्तांना प्राधिकृत अधिकारी, तर उपशहर अभियंत्यांना सहायक प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. प्रारुप मतदार यादी तयार करण्यासाठी विभागनिहाय भाग संबंधित विभागीय कार्यालयांना वितरित करण्यात आले असून, त्यावर कंट्रोल चार्ट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. दिवाळीपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना कंट्रोल चार्ट तयार करण्याची पद्धत, प्रभाग विभागणीच्या अनुषंगाने करावयाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि त्यावरील प्रशिक्षण देण्यात आले होते.

सोमवारी दुपारी 3.30 वाजता महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सर्व प्राधिकृत अधिकारी, सहायक प्राधिकृत अधिकारी व पर्यवेक्षकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत कंट्रोल चार्ट तयार करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली तसेच पर्यवेक्षकांच्या शंका व समस्या दूर करण्यात आल्या.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे व निवडणूक अधीक्षक सुधाकर चलावाड व  पर्यवक्षेक उपस्थित होते

तरी बीएलओ व पर्यवेक्षक हे प्रत्यक्ष प्रभागात जाऊन मतदार यादीशी संबंधित काम करणार असल्याने नागरिकांनी आपल्या भागात येणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes