+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule05 Sep 24 person by visibility 366 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये पथविक्रेता समितीच्या सर्वसाधारण गटामधील दोन जागांसाठी दिलीप पवार, किरण गवळी यांची निवड झाली आहे. यामध्ये दिलीप पवार यांना 1655 तर किरण गवळी यांना 1513 मते मिळाली. तर दत्ता रामचंद्र चौगुले यांना 61 व इंद्रजीत कृष्णात शेट्टी यांना 586 मते मिळाली. या निवडणूकीसाठी 5630 मतदानापैकी 2140 मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये नाटासाठी 11 व बाद मते 24 पडली आहेत.

 उमेदवारांच्या माघारीनंतर पाच जागांसाठी एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने या जागांवर यापुर्वीच 5 जागांसाठी बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये अनु:जाती महिला मधून सरोज राजेंद्र कांबळे, अल्पसंख्याक महिला मधून मुमताज अब्दुल बागवान, इतर मागास प्रवर्ग मधून नंदकुमार आनंदराव वळंजू, सर्वसाधारण महिला मधून शेवताबाई वसंतराव जाधव, दिव्यांग मधून अमर रहंदोमल छत्री यांची बिनविरोध निवड झाली आहे.

 हि निवडणूक व मतमोजणी प्रक्रिया प्रशासक के.मंजूलक्ष्मी, निवडणूक निर्णय अधिकारी उप-आयुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यासाठी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय पाटील, नोडल ऑफिसर विलास साळुंखे, सुधाकर चल्लावाड, एनयुएलएमचे व्यवस्थापक रोहित सोनुले, विजय तळेकर, विजय वणकुद्रे यांनी कामकाज पाहिले.