+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule10 Aug 24 person by visibility 344 categoryमहानगरपालिका
▪️पावसामुळे खराब झालेल्या शहरातील इतर रस्त्यांसाठी महापालिका स्वनिधीमधून 2 कोटीची तरतूद

कोल्हापूर : शहरातील तीन वर्षाच्या देखभाल दुरुस्ती कालावधीतील सर्व ठेकेदारांना महापालिकेच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. शहरातील बरेचसे रस्ते खराब झाले असल्याने जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये आहेत ते रस्ते तातडीने संबंधीत ठेकेदारामार्फत दुरुस्त करुन घेण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने तीन वर्षाच्या कलावधीतील ठेकेदारांना उप-शहर अभियंता यांनी नोटीस बजावली आहे.

 शहरातील रस्त्यांबाबत महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आयुक्त कार्यालयात आज सकाळी शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांची आढावा बैठक घेतली. यावेळी देखभाल दुरुस्ती व्यतिरिक्त इतर रस्त्यांसाठी तातडीने महापालिकेच्या स्वनिधीमधून 2 कोटीची तरतूद करण्याच्या सूचना मुख्य लेखापाल यांना दिल्या आहेत.

    यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहरामध्ये मोठया प्रमाणात खड्डे पडलेले आहेत ते तातडीने विभागीय कार्यालयाअंतर्गत मुजविण्यात यावेत. गणेश उत्सवापुर्वी शहरातील सर्व रस्त्यांचे पॅचवर्क तातडीने पुर्ण करुन घ्यावे. हे रस्ते विहित मुदतीत पुर्ण न झालेस शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांना जबाबदार धरणार असलेचे सांगितले. तीन वर्षाच्या देखभाल दुरुस्ती कालावधीतील जे रस्ते आहेत ते विहित मुदतीत पुर्ण करुन घ्यावे. मुदतीत रस्ते संबंधीत ठेकेदार यांनी केले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शंभर कोटीच्या मंजूर रस्त्यांवरील खड्डे संबंधीत ठेकेदारामार्फत दुरुस्त करुन घ्यावे. शहरातील इतर रस्ते पॅचवर्क करण्यासाठी तातडीने अल्प मुदतीची निविदा प्रसिध्द करुन प्रत्येक विभागीय कार्यालयात 2 ठेकेदार प्रमाणे 8 ठेकेदारामार्फत पॅचवकी कामे उपशहर अभियंता यांनी करुन घेण्याच्या सूचना दिल्या. 

 यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, सतिश फप्पे, कनिष्ठ अभियंता अक्षय अटकर उपस्थित होते.