कोल्हापूर महानगरपालिका : सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडतीची रंगीत तालीम पार
schedule08 Nov 25 person by visibility 75 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी होणाऱ्या आरक्षण सोडतीची रंगीत तालीम आज घेण्यात आली. ही तालीम प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात घेण्यात आली. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या या तालीमीत निवडणूक प्रक्रियेचे वास्तवदर्शी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आरक्षण प्रक्रियेचे संनियंत्रण केले.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी या रंगीत तालीमीत सहभाग घेत आरक्षण सोडतीची प्रतिकृती सादर केली. यावेळी उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगरसचिव सुनील बिद्रे, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, कामगार अधिकारी राम काटकर, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सिस्टम मॅनेजर यशपालसिंग रजपूत उपस्थित होते.
महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रत्यक्ष आरक्षण सोडत मंगळवार, दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण नागरिकांना https://www.facebook.com/kolhapurcorporation या अधिकृत फेसबुक पेजवर पाहता येईल. तसेच स्थानिक केबल चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपणही केले जाणार आहे. नागरिकांना घरी बसून या थेट प्रक्षेपणाद्वारे आरक्षण सोडतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.