खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule08 Nov 25 person by visibility 43 categoryराज्य
नागपूर : स्थानिक आणि विदर्भातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांची कला बघण्याची संधी देणारा खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या महोत्सवाच्या संकल्पनेबद्दल त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले आणि आभार मानले.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आज दुसऱ्या दिवशी हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांची लाइव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार प्रवीण दटके, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे व महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.