कोल्हापूर महानगरपालिका : 5 झाडू कामगारांना वारसा नियुक्तीपत्रे
schedule04 Oct 25 person by visibility 222 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : लाडपागे कमिटीच्या शिफारशीनुसार पात्र वारसांना महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पात्र कामगारांच्या वारसांना हि नियुक्ती पत्रे देण्यात आली.
लाडपागे कमिटीच्या शिफारशीनुसार 21 झाडू कामगारांच्या वारसांना नियुक्ती पत्रे देण्यास प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची अंतिम मान्यता झालेली आहे. यापैकी प्राथमिक स्वरुपात आज 5 झाडू कामगारांच्या वारसांना हि नियुक्ती पत्रे देण्यात आली.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षिरसागर, आमदार अमल महाडिक, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, माजी गटनेते शारगंधर देशमुख, माजी नगरसेवक सत्यजित कदम, आदिल फरास, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कामगार अधिकारी राम काटकर आदी अधिकारी उपस्थित होते.