कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - 2025 चे आरक्षण सोडत उद्या मंगळवारी
schedule10 Nov 25 person by visibility 56 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 चे आरक्षण सोडत मंगळवार, दि.11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून काढण्यात येणार आहे. सदरचे आरक्षण सोडत शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृह येथे काढण्यात येणार आहे. या सोडतीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. या आरक्षण सोडतीच्या तयारीची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी समक्ष पाहणी केली.
या आरक्षण सोडतीचे शहरामध्ये बी न्यूज या स्थानिक वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर फेसबुकवर https://www.facebook.com/kolhapurcorporation या लिंकवर आरक्षण सोडत पाहता येणार आहे.
तरी नागरीकांनी घरी बसून थेट प्रक्षेपणाद्वारे आरक्षण सोडतीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.