कोल्हापूर महापालिकेच्यावतीने 54 कर्मचाऱ्यांना पदोन्नती
schedule10 Nov 25 person by visibility 104 categoryमहानगरपालिका
▪️वरिष्ठ लिपिक पदी 9 तर कनिष्ठ लिपिक पदी 45 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कोल्हापूर : महापालिकेच्या विविध विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक यांची आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या आदेशाने पदोन्नत्या करण्यात आल्या. महापालिकेत गेले वर्षेभर प्रशासनाने कर्मचा-यांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे विविध पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळालेली आहे. यापूर्वी अधीक्षक, सहा.अधीक्षक, वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे.
सोमवारी महापालिकेने दिलेल्या पदोन्नतीमध्ये वरिष्ठ लिपीक पदी 9 व कनिष्ठ लिपिक पदी 45 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सदरची प्रक्रिया अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, नगरसचिव सुनील बिद्रे, कामगार अधिकारी राम काटकर व रवका अधिकारी प्रशांत पंडत यांनी राबविली.