+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule04 Sep 24 person by visibility 1046 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शिक्षक दिनाच्या निमित्याने महानगरपालिका व खाजगी अनुदानित शाळातील ज्या शिक्षकांनी आपल्या सेवाकालावधीत शैक्षणिक, सामाजिक, विविध उपक्रम, स्पर्धा, यामध्ये उल्लेखनियकामगारी बजावून शाळेत शिक्षणघेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले आहे अशा गुणी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करुन त्यांचा यथोचित सत्कार केला जातो.

 सन 2023-24 सालातील आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता महानगरपालिकेच्या शाळेतील 5 सहाय्यक शिक्षक, खाजगी अनुदानित शाळेतील 3 सहाय्यक शिक्षक व 1 महापालिका शाळेतील कला शिक्षक असे 9 शिक्षकांनी आपले प्रस्ताव कार्यालयाकडे सादर केले होते. त्याचबरोबर महापालिका शाळेतील 5 सेवक कर्मचारी यांनी प्रस्ताव सादर केले होते. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार शहरस्तरीय आदर्श शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार समिती गठीत करण्यात आली. या गठीत समितीमध्ये उप-आयुक्त साधना पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणसंस्था डाएटच्या अधिव्याख्याता डॉ.अंजली सतिश रसाळ, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी आर. व्ही. कांबळे, राज्य पुरस्कारविजेते, सहसचिव दिन्युएज्युकेशन सोसायटी प्रा.प्रभाकर शाहू हेरवाडे, शैक्षणिक पर्यवक्षक विजय माळी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. या गठीत समिती मार्फत दि.27 ऑगस्ट 2024 रोजी प्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलाखत कार्यक्रम प्राथमिक शिक्षण समितीचे कार्यालयात घेण्यात आला. यावेळी प्राप्त शिक्षकांच्या मौखिक मुलाखती घेवून गुण देण्यात आले.

या गठीत समितीने दिले गुणानुसार आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. बुधवारी पत्रकार परिषदेत उप-आयुक्त पंडीत पाटील यांनी महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यामंदिरच्या सहा. शिक्षक मनिषा ऋषिकेश पांचाळ, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिरच्या सहा. शिक्षक निता खाडे, रा.छ.संभाजी विद्या मंदिर देवकर पाणंदच्या सहा. शिक्षक संभाजी चौगले, स्व. यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरचे सहा.शिक्षिका वैशाली विजय कोळी, टेंबलाईवाडी विद्यामंदिरच्या सहा.शिक्षिका श्रीमती वंदना संजय कमले यांचा आदर्श शिक्षक पुरस्कारा करिता निवड करण्यात आली. तर रा.छ.संभाजी विद्यामंदिरचे कलाशिक्षक जितेंद्र मोरे यांची विशेष शिक्षक पुरस्कारा करिता निवड करण्यात आली. 

तसेच महापालिकेच्या द्वारकानाथकपूर गंजीमाळ भाग शाळेचे सेवक शिवाजी पाटील, छ. राजाराम महाराज ऊर्दू मराठी स्कूलचे सेवक शब्बीर नदाफ व एस्तेर पॅटर्न स्कूलचे सेवक प्रवीण पिसाळ यांची आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कारा करिता 3 कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे खाजगी शाळेच्या न्यु हायस्कूल मराठी शाखेच्या सहा.शिक्षक कैलास भोईटे, राजारामपूरी नेहरु विद्यालयाच्या सहा.शिक्षिका शोभा शिंत्रे, शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालयाच्या सहा.शिक्षिका सायली शेडगे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारा करिता निवड करण्यात आलेचे जाहिर केले.       

हे पुरस्कार प्राप्त आदर्श सहा.शिक्षक, विशेष शिक्षक व आदर्श शिक्षकेतर कर्मचारी यांची नावे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची मान्यता घेवून पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. या कार्यक्रमास शहरस्तरीय आदर्शशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार समिती सदस्य, कोल्हापूर शिक्षण समिती कार्यालयाकडील कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, वरिष्ठ लिपिक श्रीमती निकिता अंबुलगेकर, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई, सुर्यकांत ढाले, अजय गोसावी, किरण रणसिंग, क्रिडा निरिक्षक सचिन पांडव, शांताराम सुतार व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या निर्देशानुसार लवकरच घेण्यात येईल असे उप आयुक्त पंडीत पाटील यांनी सांगितले.

यावेळी प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे, कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, सौ.उषा सरदेसाई उपस्थित होते.