SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्वातंत्र्यदिनासोबत रगडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळाशाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन; राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळाक्रांतिवीर मदनलाल धिंग्रा: मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणारा अमर हुतात्मामाजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वनसैनिक टाकळी एमआयडीसीचा विरोध खरा, की यड्रावकरांना घेरण्याचा डाव? मार्केट कमिटीच्या बैठकीनंतर शिरोळ तालुक्यात जोरदार चर्चाकोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल : माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवईअभियंत्यांनी नोकरी शोधणारे नाही, तर नोकऱ्या देणारे व्हावे " राज्यपाल जिष्णु देव वर्मासांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार यड्रावकर यांचा निर्णायक पाठपुरावासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात स्वच्छता व वर्कशॉप कर्मचाऱ्यांचा सत्कारसंगीताच्या सुरावटीत घामाचा सन्मान! 'संगीतसूर्य'च्या नूतनीकरणाच्या मंचावर स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रांगडा कलाविष्कार

जाहिरात

 

शाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन; राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा

schedule17 Aug 26 person by visibility 146 categoryराज्य

कोल्हापूर : ​शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा ज्येष्ठ नेत्या संजीवनीदेवी गायकवाड यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्रस्त होत्या. त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.


​संजीवनीदेवी गायकवाड या 'गोकुळ' दूध संघाचे माजी संचालक करणसिंह गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य योगीराज गायकवाड आणि इंद्रजीत गायकवाड यांच्या मातोश्री, तर शाहूवाडीचे दिवंगत माजी आमदार संजयसिंह गायकवाड यांच्या पत्नी होत. त्यांचा जन्म शाहूवाडी तालुक्यातील सरुड येथील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. संजयसिंह गायकवाड यांच्या पश्चात त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यात त्यांनी मोलाचा सहभाग दिला होता.
​पती संजयसिंह गायकवाड यांच्या निधनानंतर वर्ष २००० मध्ये झालेल्या शाहूवाडी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत त्यांनी सुमारे चार वर्षे विधानसभेत मतदारसंघाचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. याशिवाय, 'गोकुळ' दूध संघामध्ये त्यांनी सलग १० वर्षे संचालिका म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती.


​सोमवारी सकाळी ११ वाजता कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर जुना बुधवार पेठेतील गायकवाड वाड्यात अंत्यदर्शन ठेवण्यात आले होते. या ठिकाणी शाहूवाडी तालुका आणि जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी व ग्रामस्थांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes