SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्वातंत्र्यदिनासोबत रगडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळाशाहूवाडीच्या माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे निधन; राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळाक्रांतिवीर मदनलाल धिंग्रा: मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणारा अमर हुतात्मामाजी सरन्यायाधीश भूषण गवई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडून पाटील कुटुंबीयांचे सांत्वनसैनिक टाकळी एमआयडीसीचा विरोध खरा, की यड्रावकरांना घेरण्याचा डाव? मार्केट कमिटीच्या बैठकीनंतर शिरोळ तालुक्यात जोरदार चर्चाकोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल : माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवईअभियंत्यांनी नोकरी शोधणारे नाही, तर नोकऱ्या देणारे व्हावे " राज्यपाल जिष्णु देव वर्मासांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार यड्रावकर यांचा निर्णायक पाठपुरावासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात स्वच्छता व वर्कशॉप कर्मचाऱ्यांचा सत्कारसंगीताच्या सुरावटीत घामाचा सन्मान! 'संगीतसूर्य'च्या नूतनीकरणाच्या मंचावर स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रांगडा कलाविष्कार

जाहिरात

 

स्वातंत्र्यदिनासोबत रगडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा

schedule17 Aug 26 person by visibility 147 categoryसामाजिक

कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत रगडियन जिमचा चौथा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील रामकृष्ण हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला रगडियन जिमच्या सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमात रगडियन जिमच्या सभासदांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि रगडियनच्या वर्धापनदिनाचा आनंद यामुळे संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले होते.

यावेळी कोरगावकर ट्रस्टचे राज कोरगावकर यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी राज कोरगावकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला निवृत्त पोलीस अधीक्षक तानाजी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदिल फरास, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विराज पाटील, कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सुशांत चव्हाण यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रगडियन जिमचे प्रमुख आकाश कोरगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिमच्या सभासद आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

यावेळी अमोल कोरगावकर, आकाश कोरगावकर, पूनम कोरगावकर, ओम कोरगावकर, प्रशांत डांगरे यांच्यासह रगडियन जिमचे सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाचा देशभक्तीचा उत्साह, रगडियन जिमच्या चौथ्या वर्धापनदिनाचा आनंद आणि सभासदांच्या सांस्कृतिक सादरीकरणामुळे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes