+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule23 Aug 24 person by visibility 307 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : गणरायाचे आगमन लवरच होत आहे. शहरातील अनेक तरुण मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. सार्वजनिक ठिकाणी मांडव टाकून बाप्पाची प्रतिष्ठापणा केली जाते. यासाठी काही वेळेस खड्डे खणले जातात, तर बऱ्याच वेळेस ते न खणता देखील मांडव उभारणी केली जाते. प्रत्येक मंडळाला खड्डे पावती पोटी किमान दोन हजार इतकी रक्कम महापालिकेला द्यावी लागते. 

यावर्षी शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झालेत. अशावेळी गणेश मंडळांकडून खड्डा पावती घेणे योग्य नाही. ती घ्यायची झाल्यास आधी रस्ते खड्डेमुक्त करा आणि मगच खड्डा पावती घ्या अशी मागणी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी महापालिका प्रशासनाला दिला. याबाबत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याशी चर्चा झाली.

दोष दायित्व कालावधी मधील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरु नाही. खड्ड्यांसाठी जबाबदार ठेकेदार आणि प्रशासन असताना गणेशोत्सव मंडळांना त्याचा भुर्दंड का असा सवाल देसाई यांनी केला.

खड्डे पावती माफ करण्याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास शहरातील सर्व मंडळे याविरोधात एकत्र येऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा आप ने दिला. याबाबतचे निवेदन उपायुक्त साधना पाटील यांना देण्यात आले. 

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, विजय हेगडे, मयूर भोसले आदी उपस्थित होते.