+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule17 Oct 24 person by visibility 183 categoryराजकीय
 नवी दिल्ली : चंदीगड. नायब सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. पंचकुलामध्ये नायब सिंग सैनी राज्याचे नवे प्रमुख म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. पंचकुलाच्या सेक्टर-5 येथील दसरा मैदानावर या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाय 18 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.

नायब सैनी दुसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्र्यांसह एकूण 14 मंत्र्यांनी शपथ घेतली. अनिल विज यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. महिला कोट्यातील आमदारांना मंत्री करण्यात आले आहे.

 प्रत्यक्षात बुधवारी पंचकुलामध्ये भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक झाली आणि त्यात नायब सैनी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे नेते अमित शहा आणि मनोहर लाल खट्टरही उपस्थित होते.   

  शपथविधी सोहळ्यास गृहमंत्री अमित शहा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई, उपमुख्यमंत्री अरुण जैन साओ, विजय शर्मा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री मनोहर लाल खट्टर, खासदार सीएम मोहन लाल यादव आणि जेपी नड्डा आदी उपस्थित होते.