+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule17 Oct 24 person by visibility 166 categoryराज्य
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान अधिविभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्या (दि. १८) जागतिक अन्न दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागामार्फत जागृतीपर उपक्रमांतर्गत पोस्टर प्रदर्शन, प्रात्यक्षिक सादरीकरण आदींचे आयोजन केले आहे. आज समाजमाध्यमांच्या कालखंडात फसव्या व दिशाभूल करणाऱ्या बाबींचा प्रसार झपाट्याने होतो. याचाच वापर अनेकदा प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांना तसेच तत्सम उत्पादने निर्माण करणाऱ्या उत्पादकांना बदनाम करण्यासाठी देखील केला जातो. याबाबत जनमानसातील संभ्रम दूर करण्याच्या उद्देशाने अधिविभागातील विद्यार्थ्यांमार्फत अन्न प्रक्रिया उत्पादनांबाबतचे माहितीपर स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. 

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात उद्या सकाळी ११ वाजल्यापासून सदर स्टॉल्स संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहतील. इच्छुक सजग नागरिकांनी या उपक्रमास भेट देऊन योग्य माहिती घ्यावी, असे आवाहन अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अभिजीत गाताडे (९०२८७८५८०७) व डॉ. हर्षवर्धन आप्पासो कांबळे (९९७५६५९२४६) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.