+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule17 Oct 24 person by visibility 229 categoryगुन्हे
कोल्हापूर : बेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक करण्यात आली त्याच्याकडून 01 गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र), 03 जीवंत राऊंड व मोपेड असा 1,51,500 /- रूपये किंमतीचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला.

 आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली की, कृष्णा सुरेश कलकुटकी रा. खुपीरे, ता. करवीर यांचेकडे बेकायदेशीर पिस्टल असून तो आज रोजी दुपारी वीटभट्टी,दोनवडे फाटा, ता. करवीर येथे त्याचेकडील पिस्टल व राऊंड कोणाला तरी विक्री करणेसाठी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या अनुषंगाने सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांचे समवेत पथक तयार करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

 त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांनी त्यांचे पथकासह आज दि. 17/10/2024 रोजी दोनवडे फाटा ते साबळेवाडी जाणारे रोडवरील वीटभट्टीचे ठिकाणी सापळा लावून इसम नामे कृष्णा सुरेश कलकुटकी वय 38, रा. खुपीरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर यास ताबेत घेतले. त्यांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात 01 गावठी बनावटीचे पिस्टल, 03 जीवंत राऊंड व अॅक्टीव्हा मोपेड असा एकूण 1,51,500/- रुपये किंमतीचा मुदंदेमाल कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत केला आहे. नमुद इसमाचे विरुध्द करवीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अमंलदार संतोष बरगे, गजानन गुरव, सागर चौगले, वैभव पाटील, प्रविण पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, कृष्णात पिंगळे, नामदेव यादव, राजू येडगे यांचे पथकाने केलेली आहे.