+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule17 Oct 24 person by visibility 172 categoryराज्य
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. फिल्म कोर्सच्या वतीने दि. 19 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत सचिन जाधव आणि नचिकेत वायकर दिग्दर्शित 'तेंडल्या' या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये हे स्क्रीनिंग होणार असून सर्वांसाठी ते खुले आहे. 

'तेंडल्या' चित्रपटाला बेस्ट ऑडिओग्राफी नॅशनल अवॉर्ड त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट बेस्ट डेब्युट डिरेक्टर आणि बेस्ट डेब्युट ऍक्टर, बेस्ट फिल्म, बेस्ट चाईल्ड आणि बेस्ट एडिटर अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. स्क्रीनिंग नंतर दिग्दर्शक सचिन जाधव चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया या विषयावर संवाद साधणार आहेत. 

सर्वांनी या स्क्रीनिंगमध्ये आणि त्यानंतरच्या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन मास कम्युनिकेशन आणि बी. ए. फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.