+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule17 Oct 24 person by visibility 223 categoryसामाजिक
कोल्हापूर : प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करा, असे प्रतिपादन जितो अपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी केले.

हॉटेल सयाजी येथे जितो कोल्हापूर चॅप्टरची सन २०२४ - २६ या सालाकरिता नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून भंडारी बोलत होते.

ते म्हणाले, जितो संघटनेचे कार्य जगभरातील 29 देशांत, भारतात 71 शहरांत आहे. सर्वसामान्य लोकांना मोठे बनविणारी संस्था आहे. सेवा, समृद्धी आणि आर्थिक सुदृढता या तीन प्रमुख उद्दिष्टांना समोर ठेवून काम करण्यासाठी जितोचा मोठा फ्लॅटफ़ॉर्म आपणासमोर आहे. 11 प्रकल्प सुरू आहेत.
  
ते म्हणाले, जितोच्या विविध माध्यमातून प्रत्येकाला समाजासाठी काम करता येईल. सर्वांच्या सहयोगातून जितो आवास योजना, गर्ल्स आणि ब़ॉईज ह़ॉस्टेलबरोबर बिझनेस स्कूलचे काम लवकरच पूर्णत्वास जाईल.

यावेळी संजय घोडावत, गिरीश शहा, अनिल पाटील, जितेंद्र राठोड, नेमिचंद संघवी, रवी संघवी आदीनी मार्गदर्शन केले.  

दरम्यान, अध्यक्ष पदाकरिता तीर्थ डेव्हलपरचे चेअरमन रवी संघवी व एसपी वेल्थचे प्रवर्तक अनिल पाटील यांची चिफ सेक्रेटरीपदी निवड झाली. व्हॉईस चेअरमनपदी राजू पारीख, रमण संघवी, ट्रेझररपदी सीताराम कोरडे यांच्यासह जितोच्या यूथ विंगच्या चेअरमपदी प्रतीक ओसवाल, चीफ सेक्रेटरी पुनित कोठारी व लेडिज विंगच्या चेअरमनपदी माया राठोड, चीफ सेक्रेटरी स्विटी पोरवाल व इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

संघटनेचे नवीन प्रमुख प्रेसिडेंटपदी विजय भंडारी यांची निवड झाली. रोम चेअरमनपदी राजेंद्र जैन यांची निवड झाली. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, महेंद्र ज्वेलर्सचे चंद्रकांत ओसवाल, चार्टर्ड अकौंटंट सुनील नागावकर, अरुण ललवाणी, विजय ककडे, अतुल शहा, इचलकरंजी, बेळगावच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने जितोचे सदस्य उपस्थित होते. जान्हवी जैन यांनी सूत्रसंचालन केले. शीतल कोरडे यांनी आभार मानले.