+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule17 Oct 24 person by visibility 333 categoryगुन्हे
कोल्हापूर : मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तलवार व इतर साहित्य असा एकूण 52,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.

 अक्षय मिसाळ व स्वप्निल जाधव, दोघे रा. यवलूज, ता. पन्हाळा यांनी त्याचे मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवून समाजात दहशत निर्माण करीत आहेत अशी माहिती मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अमंलदार युवराज पाटील, सुरेश पाटील, राम कोळी, अमित सर्जे, कृष्णात पिंगळे, विजय इंगळे, शुभम संकपाळ, लखन पाटील व संजय पडवळ यांना सदरचे दोघे त्यांचेकडील स्प्लेंडर मोटर सायकलवरून दसरा चौकाचे शेजारी ग्राऊंडवर येणार असून त्यांचे मोटर सायकलला सदर स्टेटसला ठेवलेली तलवार बांधलेली आहे अशी माहिती मिळाली. 

त्या अनुषंगाने नमुद पथकाने दसरा चौकाचे शेजारील ग्राऊंडचे आसपास सापळा लावून 01) अक्षय संजय मिसाळ, व.व.28 व 02) स्वप्निल दत्तात्रय जाधव, व.व.24, दोघे रा. यवलूज, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर यांना त्यांचे कब्जातील स्प्लेंडर मोटर सायकल व एक बांधलेली तलवार असा एकूण 52,500/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह पकडले. सदर इसमांचे विरूध्द भारतीय हत्याराचा कायदा सन 1959 चे कलम 5, 25 प्रमाणे लक्ष्मीपूरी पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अमंलदार युवराज पाटील, सुरेश पाटील, राम कोळी, अमित सर्जे, कृष्णात पिंगळे, विजय इंगळे, शुभम संकपाळ, लखन पाटील व संजय पडवळ यांनी केलेली आहे.