नविन अग्निशमन वाहनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण
schedule04 Oct 25 person by visibility 159 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेमधून सन 2023-24 साठी महानगरपालिका अग्निशमन विभागाला नविन घेण्यात आलेल्या अग्निशमन वाहनाचे आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकाच्या झालेल्या या लोकार्पण कार्यक्रमावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षिरसागर, आमदार अमल महाडिक, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, माजी गटनेते शारगंधर देशमुख, माजी नगरसेवक सत्यजित कदम, आदिल फरास, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.
सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजने सन 2023-24 मधून महानगरपालिका अग्निशमन विभागाला 40 लक्ष अनुदान ही गाडी घेण्यासाठी प्राप्त झाले होते. त्यामध्ये महापालिकेच्या स्वखर्चातून रु.3 लाख घालून रु.46 लक्ष खर्च करुन 3000 लिटर क्षमतेचे वाहन घेण्यात आले आहे. सदरचे वाहन कमी क्षमतेचे असल्यामुळे लहान रस्ता व गल्लीमध्ये याचा उपयोग होणार आहे.