दिपावलीमध्ये गांधीनगर बाजार पेठेत विजेचे भारनियमन नको
schedule07 Oct 25 person by visibility 239 categoryराजकीय

कोल्हापूर : गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये दिवाळीच्या काळामध्ये वीज भारनियमन करू नये या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या करवीर तालुका शाखेतर्फे देण्यात आले.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, दीपावली सणामुळे गांधीनगर मध्ये होलसेल व रिटेल खरेदीदारांची रेलचेच सुरू असून अगदी दुकानेही दीपावलीच्या सणाला माल भरून तयार आहेत. रस्त्यावरती ही माल लावणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने संपूर्ण दिवसांमध्ये कोणत्याही वेळेस मग सकाळ असू दे किंवा संध्याकाळ दिवसभरात कोणत्याही वेळेस भारनियमन होऊ नये. ज्या डीपी वरती अतिरिक्त लोड आहे अश्या व्यवसायाच्या ठिकाणी डीपी जवळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. लाईट गेली तरी अगदी कमी वेळेत सूरू व्हावी व खरेदीदारांना व दुकानदारांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये अधिकाऱ्यांनी सतर्क राहून गरजेच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
तसेच उंचगावची ही हद्द वीट भट्टी परिसरापर्यंत असल्याने त्याही परिसरामध्ये कोणत्याही प्रकारे विज जाऊ नये अशा पद्धतीचे निवेदन उंचगावच्या वीज वितरण लाही देण्यात आले
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, ग्राहक सेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र कुबडे, शरद माळी,गांधीनगर शहर प्रमुख दिलीप सावंत, विभाग प्रमुख दीपक पोपटानी, विभाग प्रमुख विनोद रोहिडा, फेरीवाला संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास जाधव, गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक धींग, गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक अंकल, शाखाप्रमुख सुनील पारपाणी, किशोर कामरा, जितू चावला, बाबुराव पाटील, रामराव पाटील, वसंत पोवार, लालचंद खुबचंदानी आधी शिवसैनिक व व्यापारी उपस्थित होते.