+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule02 Aug 24 person by visibility 293 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शहरामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे तातडीने मुजविण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियंता व सर्व उप-शहर अभियंत्यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत मुख्य रस्ते मुरुम टाकून पॅचवर्क करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. मात्र चार दिवसापूर्वी संभाजीनगर परिसरात केलेले पॅचवर्क गायब झाले असून रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत यातून वाहनधारकांना कसरत करत जावे लागत आहे. 

 आज विभागीय कार्यालय क्र.1 अंतर्गत विश्वपंढरी देवालय ते हॉकी स्टेडियम चौक, आयसोलेश हॉस्पिटल ते शेंडापार्क, कळंबा जेल मेनरोड. विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत ब्रम्हपूरी, डी मार्ट ते फुलेवाडी मेनरोड. विभागीय कार्यालय क्र.3 अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, टाकाळा, परिखपूल. विभागीय कार्यालय क्र.4 अंतर्गत सीबीएस स्टॅण्ड, पदमा पथक चौक, इंजिनिअरींग कॉलेज मेनरोड, लाईन बझार, भगवा चौक मेन रोड परिसरात मुरुम टाकून पॅचवर्क करण्यात आले आहे.

 सदरचे पॅचवर्क अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, सतिश फप्पे, महादेव फुलारी यांनी करुन घेतले आहे.