+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule04 Sep 24 person by visibility 197 categoryशैक्षणिक
अतिग्रे : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रॅमिंग कौशल्ये विकसित करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठात कॉम्पुटर ऍप्लिकेशन्स विभागाकडून राष्ट्रीय पातळीवरील हॅकॅथॉन स्पर्धेचे ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये टिम बायनरी ब्रिगेड्स ( सी. ओ. इ. पी. पुणे) ५०,००० रु. प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक- टिम मंडे (एम. आय. टी. पुणे) ३५,०००रु.तृतीय क्रमांक टिम वेब एक्झॉर ( एस. जी. यु. अतिग्रे)२५,००० रु. बक्षीस पटकावले.

  देशभरातील विविध महाविद्यालयातील विध्यार्थी व विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला . यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेबसाईट डेव्हलपमेंट, मोबाईल ऍप्लिकेशन्स, मशीन लेर्निंग, आणि ब्लॉकचैन तंत्रज्ञानामधील आधुनिक विषयांवर प्रोग्रामिंग चॅलेंजेस देण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी सलग ४० तास मेहनत घेऊन या चॅलेंजेसचे सोल्युशन्स सादर केले. 

  कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षीस वितरण विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, विभागप्रमुख आणि संयोजक डॉ. चेतन एस. आरगे यांच्या हस्ते झाले. यासाठी विद्यार्थी समन्वयक दामोदर झंवर आणि टीमने कष्ट घेतले. डॉ. संदीप सुतार, सुशांत दहिवडकर, सतीश रणभिसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.