कागल मध्ये रविवारी जलद बुद्धिबळ स्पर्धा
schedule04 Nov 25 person by visibility 106 categoryक्रीडा
        कोल्हापूर : एक दिवशी सोळा वर्षाखालील मुलांची बुद्धिबळ स्पर्धा रविवार दि. 16 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. अनुज् चेस ॲकॅडमीच्या वतीने १६ वर्षांखालील मुला-मुलींची शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेमध्ये रोख रक्कम, चषक तसेच मेडल्स अशी एकूण 43 बक्षीसे ठेवली आहेत. रविवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी यशवंतराव घाटगे हायस्कूल, कागल येथे ही स्पर्धा होईल. स्पर्धा १६ वर्षांखालील वयोगटातील सर्व मुलांची एकत्रित एकच स्पर्धा होईल. (जन्म तारीख : १ जानेवारी २००९ किंवा त्यानंतर), इतर वयोगटात बक्षिसे १४ वर्षांखालील (१/१/२०११ किंवा त्यानंतर), १२ वर्षांखालील (१/१/२०१३ किंवा त्यानंतर), १० वर्षांखालील (१/१/२०१५ किंवा त्यानंतर), ८ वर्षांखालील (१/१/२०१७ किंवा त्यानंतर). दि. 15 नोव्हेंबर पर्यंत सहभाग नोंदवावा.
स्पर्धकांनी आधार कार्ड, स्वतःचा बुद्धिबळपट, चेस क्लॉक, टिफीन घेऊन सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक कृष्णात पाटील (९४२११०४६५०), बाबूराव पाटील (९४२२७९०४९५), अनुष्का पाटील (९३०७२९५८४८), अनुराग पाटील (८६०५७३२७३१) यांनी केले आहे.