+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule19 Aug 24 person by visibility 212 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये पथविक्रेता समितीसाठी 4 सप्टेंबरला मतदान होणार असून याची निवडणूक प्रक्रिया शनिवारपासून सुरु झाली आहे. यामध्ये 8 फेरीवाल्यांच्या प्रतिनिधीची नियुक्त करण्यात येणार असून आज दुपारी 3 वाजता दुधाळी पॅव्हेलियन येथे महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. 

यामध्ये अनुसूचित जाती 1, अल्पसंख्याक 1, खुला प्रवर्ग शासनाने ठरवून दिलेले 1 असे 3 महिलांसाठी राखीव झाले आहे. तर इतर सदस्यांमध्ये खुला प्रवर्गासाठी 2, अनुसूचित जमाती 1, इतर मागासवर्ग 1, दिव्यांगसाठी 1 अशी सदस्यांची नियुक्ती होणार आहे. या निवडीसाठी 5630 फेरीवाल्यांना मतदानाचा हक्क आहे. 

ही आरक्षण सोडत नूतन आदर्श विद्यालय व विकास हायस्कुलची विद्यार्थीनींद्वारे काढण्यात आली. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उप-आयुक्त साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, इस्टेट ऑफिसर विलास साळुंखे, एनयुएलएमचे व्यवस्थापक रोहित सोनुले, विजय तळेकर, विजय वणकुंद्रे यांनी आरक्षण सोडतीचे कामकाज पाहिले.