+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule02 Aug 24 person by visibility 313 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शहरातील बरेचसे रस्ते खराब झाले असल्याने जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये आहेत ते रस्ते तातडीने संबंधीत ठेकेदारामार्फत दुरुस्त करुन घेण्याचे आदेश प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिले. या कामामध्ये ठेकेदाराकडून अथवा अभियंत्याकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्यास संबंधीतांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या. शहरातील रस्त्याबाबत मोठया प्रमाणात तक्रारी येत असलेने आयुक्त कार्यालयात आज सकाळी रस्ते दुरुस्तीबाबत शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांची आढावा बैठक प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतली.

 यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शहरामध्ये मोठया प्रमाणात खड्डे पडलेले आहेत ते तातडीने विभागीय कार्यालयाअंतर्गत मुजविण्यात यावेत. गणेश उत्सवापुर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत करण्यात यावेत याची सर्व जबाबदारी शहर अभियंता व सर्व उपशहर अभियंता यांची राहील. वॉरंन्टी कालावधीमधील तीन वर्षाच्या आतील जे 400 रस्ते आहेत त्याची तपासणी करुन शासन निर्णय प्रमाणे ते दुरुस्त करुन घ्यावेत. त्या रस्त्यावर संबंधीत ठेकेदारामार्फत तातडीने दुरुस्ती करुन घेऊन सर्व रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे आदेश दिले. संबंधीत ठेकेदाराने जर दुरुस्तीची कामे व्यवस्थीत केली नाहीत तर त्याच्यावर कारवाई करुन पुढील कोणतेही नविन काम देण्यात येऊ नये.

 शहरातील इतर रस्ते विभागीय कार्यालयामार्फत तातडीने दुरुस्ती करुन सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना यावेळी संबंधीत उपशहर अभियंता यांना दिल्या.

   यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, सतिश फप्पे, महादेव फुलारी उपस्थित होते.