+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule13 Aug 24 person by visibility 180 categoryगुन्हे
कोल्हापूर : तिसंगी (ता. गगनबावडा) येथील जंगलात सांबराची शिकार केलेल्या पाचजणांवर गगनबावडा वनविभागाने कारवाई केली. घटनास्थळावरून तिघाजणांना ताब्यात घेतले तर उर्वरित पसार झालेल्या दोघाजणांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीउशिरा ताब्यात घेतले.

रविवारी दुपारी निवडे गावातील पाच जणांनी तिसंगी येथील वनक्षेत्राच्या हद्दीतील मीटर माळ येथे मादी जातीच्या सांबराची शिकार केली. यावेळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनीघटनास्थळी धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले. यात पाच शिकाऱ्यापैकी दोघे बंदुक व शस्त्रासह पसार झाले. पसार झालेल्या उर्वरित दोघांना रविवारी रात्री उशिरा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. 

मादी जातीच्या सांबराची शिकार करणाऱ्या सुभाष बापू पाटील, विठ्ठल कोंडीबा पाटील, जालिंदर कृष्णा पाटील, पांडुरंग बाबू पाटील संजय लहू पाटील सर्वजण (रा. निवडे) या पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

 ही कारवाई उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील, गगनबावडा वनक्षेत्रपाल प्रियांका भवार, निवडे वनपाल संभाजी चरापले, वनरक्षक ओंकार भोसले, प्रकाश खाडे, नितीन शिंदे, वनमजूर धोंडीराम नाकाडे, दादू पाटील, मुबारक नाकाडे, नाथा कांबळे यांनी केली.