आप युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी मोईन मोकाशी यांची निवड
schedule23 Apr 26 person by visibility 109 categoryराजकीय
कोल्हापूर : आम आदमी पार्टी युवा आघाडी महाराष्ट्रची राज्य समिती काल जाहीर झाली. यामध्ये आप चे युवक शहराध्यक्ष मोईन इजाज मोकाशी यांची प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड झाली.
मोईन मोकाशी हे गेले सहा वर्षे युवा आघाडी चे शहराध्यक्ष म्हणुन कार्यरत होते. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात, मोर्चा, पक्षाचे संघटनात्मक कार्यक्रमात, झालेल्या सर्वच निवडणुकीत मोकाशी ह्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचे प्रभीवी वक्तृत्व व संघटन कौशल्य लक्षात घेऊन पक्षाने त्यांना ही जबाबदारी दिली आहे.
आप चे महाराष्ट्र प्रभारी प्रकाश जरवाल, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रदेश संघटन सचिव संदिप देसाई यांच्या मान्यतेने युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रवीराज काळे यांनी ही निवड जाहीर केली.