डीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक ‘ कंपनीमध्ये निवड
schedule22 May 25 person by visibility 274 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : येथील डीकेटीई इन्स्टिटयूट मधील इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन मधील यश चौगुले, सोहम गडेकर, निखील गुनाकी, राजभूषण कदम, विराज पाटील, व वैभव टेके यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक इंडिया प्रा. लि. ने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हयुव मध्ये उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे.
मित्सुबिशी इलेक्ट्रीक ही ऑटोमेशन आणि इलेक्ट्रीकल उपकरणांच्या क्षेत्रात कंम्पोनंट बनविणारी आंतरराष्ट्रीय कंपनी असुन दरवर्षी या कंपनीच्या वतीने कॅम्पस इंटरव्हयू घेतले जातात. या निवडीमुळे नामांकित कंपन्यामध्ये प्लेसमेंटमध्ये डीकेटीईने पुन्हा एकदा मोठी बाजी मारली आहे.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात उद्योगविश्वाला बहुआयामी कौशल्य असलेल्या आंतरविद्याशाखीय प्रकल्पांवर सक्षमपणे कार्य करु शकणा-या अभियंत्यांची गरज आहे. ही गरज ओळखून त्या अनुशंगाने डीकेटीई मध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड होण्यास मदत होत आहे. विद्यार्थ्यांची कंपनीमध्ये निवड होण्यासाठी सॉफ्ट स्कीलवरील चाचण्या, तज्ञांकडून मार्गदर्शन सत्रे, तसेच टेक्नीकल मुलाखातींसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे डीकेटीईचे विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्टया नव्हे तर व्यावसायिकदृष्टयाही सक्षम बनत आहेत आणि उदयोजगतात यशस्वीपणे आपली छाप पाडत आहेत.
विद्यार्थ्यांस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,सचिव डॉ.सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांस डायरेक्टर डॉ. एल. एस. अडमुठे, डे.डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ. एस. ए. पाटील, टीपीओ प्रा.जी.एस.जोशी, व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.