+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule05 Sep 24 person by visibility 252 categoryसामाजिक
कोल्हापूर : समाज माध्यम हे दुधारी शस्त्र असून यूट्यूबरने आपला विवेक जागृत ठेवून अर्थार्जन करावे. असे प्रतिपादन हिंदी विभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी केले. 

शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाच्यावतीने ‘यूट्यूब चॅनल : निर्माण, उपयोग, रोजगार’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा समापन सत्रात त्या बोलत होत्या. 

पीएम उषा योजनेअंतर्गत आयोजित या कार्यशाळेत 190 विद्यार्थी व संशोधकांनी सहभाग नोंदविला. डॉ करेकट्टी यांनी कार्यशाळेतील उपस्थिती पाहता आणखी व्यापक स्तरावर कार्यशाळा आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.

दूस-या दिवसाच्या पहिल्या सत्रात समाज माध्यम तज्ज्ञ डॉ. आलोक जत्राटकर यांनी चांगल्या यूट्यूबर बनण्यासाठी कंटेंट, क्रिएटिव्हीटी, कन्सिस्टंसी सोबत प्रगल्भ व विवेकवादी समाज निर्मितीसाठी काँसिएन्स (विवेक) ही चौथी बाब अतिशय महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले. जत्राटकर यांनी संवाद साधनांच्या महत्त्वाविषयी व्यापक माहिती दिली. दुस-या सत्रात डॉ. सुषमा चौगले यांनी व्हिडीओ क्वालिटी व एडिटिंगबाबत प्रात्यक्षिक दाखविले. 

यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश मुंज यांनी केले. कार्यशाळेचे संयोजक डॉ. अक्षय भोसले, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. गीता दोडमणी, प्रा. अनिल मकर यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.