+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustपरप्रांतीयाचा डोक्यात दगड घालून खून केल्या प्रकरणी दोघांना अटक adjustविकसित भारत निर्माणासाठी संशोधकांना राष्ट्रीय कार्यशाळेसारखे व्यासपीठ गरजेचे : प्रा. (डॉ.) एस. एच. पवार adjust‘डिजिटल माध्यमांच्या उत्पन्नाचे स्त्रोत’ वर विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा adjustअनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर adjustकाँग्रेसचे नेते राहुल गांधीबाबत विरोधकांना धास्ती-आ. सतेज पाटील; आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध adjustकेआयटीमध्ये ‘स्टुडन्ट इंडक्शन’ उपक्रमाचे उद्घाटन; प्रथम वर्ष विद्यार्थ्याना सर्वांगीण विकासासाठी तज्ञांचे मार्गदर्शन होणार adjust" एकविसाव्या शतकातील भारत आणि मूल्यशिक्षण " adjustकोल्हापुरातील गणेश मंडळाच्या स्टेजवर तलवार घेऊन गुंडाची दहशत adjustशिंगणापूर ग्रामपंचायतीच्या चुकीच्या ठरावाने गोंधळ; ग्रामपंचायतीने मागितली माफी... adjustराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड; महाराष्ट्रातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 'संविधान मंदिरांचे लोकार्पण
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule06 Sep 24 person by visibility 224 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रसाराच्या काळामध्ये शिक्षकांची जबाबदारी वाढलेली असून विद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. वर्षा मैंदरगी यांनी केले.

 शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागामार्फत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ''शिक्षका दिन व माजी विद्यार्थीं स्नेह मेळावा'' आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.मैंदरगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार उपस्थित होत्या. 

  माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तथा विभागातील विद्यार्थ्यांचा विविध व्यवसायिक पात्रतेसाठी आवश्यक असलेल्या सेट, नेट, सिटेट, पीएचडी परीक्षांमधील यशाबद्‌द्ल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  

 यावेळी अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पल्लवी कांबळे, ऐश्वर्या मुरुथवर व नेहा लाटे यांनी केले.

 कार्यक्रमामध्ये शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ. सुप्रिया पाटील, श्रीमती सरस्वती कांबळे, श्रीमती सारिका पाटील, श्रीमती संगिता चंदनवाले यांचेसह विभागातील बी. एड. - एम. एड. व एम. एड. अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.