SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजापूर–राजापूरवाडी रस्त्यासाठी आमदार यड्रावकर यांचा ५० लाखांचा निधी मंजूरघालवाड येथील आरोग्य शिबिरात ३८६ नागरिकांची तपासणीसंयुक्त राष्ट्र दिन: जागतिक शांतता आणि एकात्मतेचे प्रतीक पार्श्वभूमी आणि स्थापनापुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदपरीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलसिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रणघरफाळा थकबाकीदारांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडितशहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 62 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईगोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे; सतेज पाटील यांचे गाेकुळ संचालकांना घेऊन हालसिद्धनाथाला साकडेकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’

जाहिरात

 

राजापूर–राजापूरवाडी रस्त्यासाठी आमदार यड्रावकर यांचा ५० लाखांचा निधी मंजूर

schedule24 Oct 26 person by visibility 136 categoryराज्य

◼️विद्यार्थिनीच्या भावनिक पत्राची दखल; रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार

जयसिंगपूर : गट-तट, पक्षीय राजकारण आणि लहान-मोठे भेद बाजूला ठेवून एका विद्यार्थिनीच्या भावनिक पत्राची दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दखल घेतली असून तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. राजापूर–राजापूरवाडी रस्त्याच्या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी आमदार यड्रावकर यांनी यापूर्वीच मंजूर केला आहे. मात्र, शिक्षक-पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने या कामाचा शुभारंभ करता आला नाही. या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होऊन तातडीने रस्ता पूर्ण होणार आहे.

 आमदार यड्रावकर यांच्या या पुढाकारामुळे रस्त्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीला बळ मिळाले असून, शाळेत जाण्यासाठी खड्ड्यांशी झुंज देणाऱ्या विद्यार्थिनीच्या स्वप्नांना आता सुरक्षित वाट मिळणार आहे.

‘आमदार काका, रस्ता करून द्या हो! मला खूप शिकायचे आहे. मोठी होऊन कलेक्टर बनायचे आहे,’ अशा भावनिक शब्दांत राजापूर येथील एका विद्यार्थिनीने पत्राद्वारे आमदार यड्रावकर यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडल्या होत्या. शिक्षणाची जिद्द उराशी बाळगून शाळेत जाणाऱ्या या चिमुकलीला खराब रस्त्यामुळे दररोज त्रास सहन करावा लागत होता. तिच्या पत्रातून व्यक्त झालेली व्यथा लक्षात घेत आमदार यड्रावकर यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

राजापूर गावापासून राजापूरवाडी येथील शाळेपर्यंतचे अंतर सुमारे दोन किलोमीटर आहे. यातील काही भाग चांगला असला, तरी उर्वरित रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सायकलवरून प्रवास करताना कसरत करावी लागते. पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे हा प्रवास अधिक त्रासदायक बनतो. या समस्येची दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रस्त्याच्या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आमदार यड्रावकर यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिले आहे. 

एका चिमुकलीने पत्रातून मांडलेल्या समस्येची दखल घेत कलेक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थिनीला शाळेत जाण्यासाठी खड्ड्यांशी संघर्ष करावा लागू नये, तसेच तिच्या शिक्षणाच्या प्रवासात अडथळे निर्माण होऊ नयेत, हीच या प्रयत्नामागील भावना आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारातून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर चिमुकलीच्या स्वप्नांना बळ मिळणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes