घालवाड येथील आरोग्य शिबिरात ३८६ नागरिकांची तपासणी
schedule24 Oct 26 person by visibility 150 categoryआरोग्य
◼️आरोग्य अभियानातील आजअखेर लाभार्थ्यांची संख्या १० हजार १७३ वर
शिरोळ : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत घालवाड येथे आयोजित आरोग्य शिबिरात ३८६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरामुळे अभियानातील आजअखेरच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या १० हजार १७३ वर पोहोचली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये या अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांना आपल्या गावातच आरोग्य व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोफत तपासणीचा लाभ मिळत असून आरोग्यविषयक तक्रारींचे वेळीच निदान करण्यास मदत होत आहे.
घालवाड येथील शिबिरात सुहास खाडे, अजित थोरवत, मदन मस्के, रमेश कदम, भारत कोळी, संभाजी कांबळे, रावसाहेब कांबळे, धोंडीराम फडतारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.