SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सायबर महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात गोकुळ धुमशान : “तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही" कोल्हापुरात दसरा महोत्सव शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!धम्मचक्र प्रवर्तन दिन: समता, क्रांती आणि करुणेचा सुवर्णदिनकोल्हापूर महापालिकेच्या १४६ कर्मचाऱ्यांची १५ कोटी ५ लाखांची रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजनेकडे वर्गविधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर!विधी शिक्षणातील कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा : कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्केकोरे डिप्लोमा विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड; ६ लाखांचे वार्षिक पॅकेजजिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

जाहिरात

 

सायबर महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात

schedule14 Oct 26 person by visibility 126 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  :  सायबर महाविद्यालयातील कम्प्युटर विभागामार्फत इनोवेशन इन कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती  जाधव यांच्या हस्ते झाले तर डॉ. समीर नाणीवाडेकर यांचे बीज भाषण झाले या परिषदेत सुमारे ५५ निबंधाचे सादरीकरण करण्यात आले.

 या दोन दिवसीय परिषदेत या परिषदेत अमेरिका, ब्राझील, युक्रेन,तुर्कीया ,वेतनाम, इटली ,मलेशिया ,पोर्तुगाल इत्यादी देशातील तज्ञांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले या परिषदेचा समारोप प कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.के. मस्के यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळेस सायबर चे संचालक डॉ.आर. के. टेलर कम्प्युटर विभागाच्या डीन डॉ. रजनी कामत परिषदेचे समन्वयक प्रा. मंहतेश पाटील व प्रा. मृदुला पाटकर यांनी काम पाहिले तर सायबर चे संस्थेचे अध्यक्ष डॉ. रणजीत शिंदे व सचिव सीए ऋषिकेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

या दोन दिवशी या परिषदेचे सूत्रसंचालन प्रा. देवयानी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. श्रुती जामसांडेकर व डॉ. टी. व्ही.जी. शर्मा यांनी केले कार्यक्रमास विविध राज्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes