SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दिव्यांग बालक सक्षमीकरण- शासन योजना स्टॉलची उभारणीउर्दू साहित्य कला अकादमीचा सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय समारोह उत्साहात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न; १० लाखांची मागणीकोल्हापूर जिल्ह्यात 23 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागू‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरसंप कालावधीत महावितरणकडून राज्यातील वीजपुरवठा सुरळीत५१ व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभरोटरी सेंट्रलतर्फे शिक्षकांचा सन्माननशामुक्त कोल्हापूर दौड शनिवारीपाणी बिले वाटप विलंबाचा भुर्दंड नागरिकांवर नको; चुकीची पाणी बिले त्वरित दुरुस्त करा; 'आप'चे जल अभियंतांना निवेदन

जाहिरात

 

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला विविध मान्यवरांच्या भेटी

schedule08 Oct 25 person by visibility 144 categoryसामाजिक

कोल्हापूर : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कोल्हापूर विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत लोकराज्य मासिकाचे अंक व दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले .   

  लोकराज्य अंक प्रदर्शनाला आज औद्योगिक न्यायालयाचे प्रशासकीय सदस्य (न्यायाधीश) निलेश मालुंजकर व औद्योगिक न्यायालयाचे सदस्य (न्यायाधीश) विजय आदोणे यांनी भेट देऊन पाहणी केली. तत्पूर्वी मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे,संजय गांधी योजना विभागाच्या तहसीलदार वनिता पवार , जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर आदी मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली.या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.     
 
   हे प्रदर्शन 9 ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सुरु राहणार असून या प्रदर्शनाला ग्रंथप्रेमींनी भेट द्यावी, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके यांनी केले . यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्या हस्ते न्या.मालुंजकर व न्या.आदोणे यांना कोल्हापूरच्या पर्यटनाबद्दल सर्वसमावेशक माहिती देणारी सचित्र पर्यटन पुस्तिका देण्यात आली . याप्रसंगी माहिती अधिकारी फारूक बागवान , सहायक संचालक वृषाली पाटील यांच्यासह विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes