SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कानठळ्या बसवणारी दिवाळी! कोल्हापूर शहर ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात!गोकुळच्या निवडणुकीत पात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळावाहैदराबाद येथील भारत समिट मध्ये आमदार सतेज पाटील यांचा सहभागकोल्हापूर महापालिकेच्यावतीने विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जिमवर सीलची कारवाईखाकी वर्दीतले संवेदनशील मन! हुपरीचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी वृद्धाश्रमातील निराधार मातांसोबत साजरी केली भाऊबीजबालदिनानिमित्त १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहहरभरा उत्पादनात कोल्हापूरच्या शिवाजी पाटील यांचा राज्यात प्रथम क्रमांकनिलेश पाटील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण; अपघात नव्हे घातपाताचा ग्रामस्थांचा आरोपगांधी मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच...! महिनाभरात मैदान खेळाडूंसाठी सुसज्ज करा : आमदार राजेश क्षीरसागरमानवतेचा संदेश देणारा जागतिक दयाळूपणा दिन

जाहिरात

 

कानठळ्या बसवणारी दिवाळी! कोल्हापूर शहर ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात!

schedule13 Nov 26 person by visibility 35 categoryराज्य

कोल्हापूर : दिवाळीच्या काळात कोल्हापूर शहरात झालेली आतषबाजी आणि कर्णकर्कश आवाज यामुळे कोल्हापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाद्वारे (Department of Environmental Science, Shivaji University, Kolhapur) केलेल्या 'ध्वनी पातळी निरीक्षण' अहवालातून (Noise Level Monitoring) एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील निवासी, व्यावसायिक आणि शांतता (Silent) अशा सर्वच क्षेत्रांमध्ये सीपीसीबी (CPCB) ने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा कैक पटीने जास्त ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली आहे.
ताराबाई पार्क ठरले सर्वाधिक धोकादायक, तर सर्वच ठिकाणी मर्यादा ओलांडल्या
अहवालानुसार, लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दोन्ही दिवशी शहरातील २२ पैकी बहुतांश ठिकाणी आवाजाची पातळी निकषांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे:

 * शांतता क्षेत्र (Silent Zone): येथील सर्व निरीक्षण स्थळांवर दोन्ही दिवशी ५० dB(A) ची CPCB मर्यादा पूर्णपणे ओलांडली गेली. यामध्ये कलेक्टर ऑफिस येथे ७५.४ dB(A) इतकी सर्वाधिक ध्वनी पातळी नोंदवली गेली.

 * निवासी क्षेत्र (Residential Zone): या क्षेत्रात ५५ dB(A) च्या मर्यादेचे उल्लंघन झाले असून, विशेषतः ताराबाई पार्क येथे लक्ष्मीपूजन दिवशी तब्बल १०१.२ dB(A) एवढी उच्च आणि कानठळ्या बसवणारी ध्वनी पातळी नोंदवली गेली.

 * व्यावसायिक क्षेत्र (Commercial Zone): ६५ dB(A) ची मर्यादा ओलांडत पाडव्याच्या दिवशी बिंदू चौक येथे ८८.८ dB(A) तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मिराजकर तिकटी येथे ९१.४ dB(A) आवाजाची नोंद झाली.

◼️प्रशासकीय नियम आणि उपाययोजनांचा अभाव
दिवाळीच्या या आनंदोत्सवात नियमांची पायमल्ली झाल्यामुळे कोल्हापूर शहरातील शांतता आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भविष्यात अशा सणांच्या काळात अतिशबाजी नियंत्रित  करणे, ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे आणि संवेदनशील क्षेत्रामध्ये नियमित ध्वनी निरीक्षण व जनजागृती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे या अहवालाच्या निष्कर्षातून स्पष्ट होते. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या या कठोर पाहणीनंतर आता प्रशासन व नागरिक काय पावले उचलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes