SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शेतकऱ्यांचा दणका! स्वाभिमानीच्या लढ्याला यश; ऊसाला मिळणार प्रतिटन ४२०० रुपये; किणी टोलनाक्यावरील 'चक्का जाम' आंदोलन मागेयुद्ध आणि सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखणे: काळाची गरजस्वाभिमानीचा महामार्गावर एल्गार: ऊस दराची कोंडी कायम; विनाकपात ₹४,२०० च्या मागणीसाठी उद्या ६ नोव्हेंबरला कोल्हापूर, सांगली, सातारा 'जिल्हा बंद'चा इशारामहापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 19 नागरिकांचे अर्ज दाखलऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथनउपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार याच आमच्या नेत्या : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरणगोकुळ'मध्ये सत्तांतर रोखण्यासाठी अध्यादेश आणल्यास तो बेकायदेशीर माजी सरन्यायाधीशांनी दिला होता कायदेशीर सल्लागोकुळच्या शासन नियुक्त संचालकांविरोधात महायुतीच्या कार्यकर्त्यांचेच बंड; बानगेत महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन!गोकुळ दूध संघाचा ‘डेडलॉक’ दूर करण्यासाठीच सरकारची कारवाई: मंत्री हसन मुश्रीफ‘गोकुळ’ मध्येू वसुबारस निमित्त- म्हैस व गाय-वासराचे पूजन

जाहिरात

 

शेतकऱ्यांचा दणका! स्वाभिमानीच्या लढ्याला यश; ऊसाला मिळणार प्रतिटन ४२०० रुपये; किणी टोलनाक्यावरील 'चक्का जाम' आंदोलन मागे

schedule06 Nov 26 person by visibility 152 categoryराज्य

कोल्हापूर / घुणकी: यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन भरभक्कम ४२०० रुपयांचा ऐतिहासिक दर मिळवून देण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील लढा यशस्वी ठरला आहे. प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरील चर्चेअंती अखेर कारखानदारांच्या प्रस्तावाला आंदोलक शेतकरी संघटनांनी मध्यरात्री मान्यता दिली, आणि किणी टोलनाक्यावरील तब्बल ६१ तास चाललेले धगधगते 'चक्का जाम' व मुक्काम आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे.

◼️अशी मिळणार शेतकऱ्यांना रक्कम:
झालेल्या वाटाघाटीनुसार यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने एकूण ४२०० रुपयांचा मोबदला मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रतिटन ३९०० रुपये दिले जातील, त्यानंतर हंगाम समाप्तीच्या वेळी १०० रुपये आणि पुढील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी २०० रुपये दिले जाणार आहेत, ज्यामुळे एकूण दर प्रतिटन ४२०० रुपयांवर पोहोचणार आहे.

◼️साखरेच्या दरामध्येही मिळणार हिस्सा:
या आंदोलनाचे सर्वात मोठे यश म्हणजे, आगामी काळात साखरेचा बाजारभाव प्रतिक्विंटल ४५०० रुपयांच्या पुढे गेल्यास, त्या वाढीव उत्पन्नातील तब्बल ७० टक्के हिस्सा थेट शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या सर्व महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लवकरच अधिकृत पत्र जारी करणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी किणी टोल नाक्यावर उपस्थित हजारो शेतकरी आंदोलकांसमोर केली.

◼️बंद आणि चक्का जाम मागे; जनजीवन पूर्ववत:
उसाच्या दराबाबत सकारात्मक तोडगा निघाल्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांत पुकारण्यात आलेला कडकडीत बंद तसेच पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यामुळे महामार्गावरील अडलेली वाहतूक आणि जनजीवन पुन्हा एकदा पूर्णपणे पूर्ववत झाले आहे. शेतकऱ्यांच्या सविस्तर आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे अखेर साखर कारखानदारांना व प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे झुकावे लागले असून, या ऐतिहासिक विजयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes