SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळलेडी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा 'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथमरमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्रीपर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण काळाची गरजमाणगाव परिषदेतून सामाजिक बदलाची खरी सुरुवात : जिल्हाधिकारी अमोल येडगेपवित्र रमजान ईद: संयम, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा मंगल सोहळाभारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ: सनईचे जादुगार आणि भारतीय संस्कृतीचे दूतऐतिहासिक माणगाव परिषदेचा १०६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार :जिल्हाधिकारी अमोल येडगेविद्यापीठात जीएसटी सुधारणांबाबत सोमवारपासून राष्ट्रीय चर्चासत्रजनकल्याणाच्या योजना गावागावात पोहोचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावे: खासदार धनंजय महाडिक यांची सूचना

जाहिरात

 

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा 'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम

schedule21 Mar 26 person by visibility 94 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय महागाव (गडहिंग्लज) येथे आयोजित ‘हॅक फेस्ट-२६’ मध्ये डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी   ‘आर्किटेक्चरल डिझाईन अँड मॉडेल मेकिंग’ स्पर्धेत  विद्यार्थिनी तयार केलेला 'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेमध्ये  दिलेल्या विषयावर डिझाईन तयार करून त्याचे कार्यरत मॉडेल सादर करण्याचे आव्हान होते. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर संघाने ‘स्मार्ट बिल्डिंग’ या संकल्पनेवर आधारित ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉपचे अभिनव डिझाईन सादर केले.

या मॉडेलला उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल  रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघात स्वयंम सागर शितोळे, आस्तिक सिंग जाधोन, सुमित तुकाराम कदम व संकल्प राजेश खोत यांचा समावेश होता. 

या विद्यार्थ्यांना आर्किटेक्ट संतोष आळवेकर, आर्किटेक्ट तन्वी शेटके, आर्किटेक्ट इंद्रजीत जाधव व आर्किटेक्ट तेजस पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ . संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील , विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार
डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख आर्कि. इंद्रजीत जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes